खूप दिवसांपासून आयफोन 15 iphone 15 ची वाट चाहते पाहत होते. मध्ये खूप वेळा याचे फीचर्स पण लीक झाले होते. पण ते किती खरे आणि खोटे होते ते आज कळाले. शिवाय हे आयफोन भारतातील तामिळनाडू मध्येच तयार झाले आहेत.
कशी आहे Iphone 15 ची डिझाईन?
यात Iphone 14 आणि Iphone 15 मध्ये गल्लत करू नका. या Iphone 15 ची डिझाईन ही Iphone 14 सारखीच असणार आहे. यावेळी पण अॅपलने त्यांच्या डिझाईन मध्ये काहीच बदल केला नाही. सगळे अपडेट हे सॉफ्टवेअर मध्येच केले आहेत.
Iphone 15 & Iphone 15 Plus चे स्पेसिफिकेशन
Iphone 15 मध्ये जे आयफोन 15 मध्ये 6.1 इंचचा डिस्प्ले आणि आयफोन 15 प्लस मध्ये ६.७ इंचचा डिस्प्ले मिळणार आहे. या दोन्ही फोनमध्ये अॅपलची A16 ही बायोनिक चिप मिळणार आहे. जी गेल्यावर्षीच्या आयफोन १४ मध्ये होती.
Iphone 15 आणि आयफोन १५ प्लस मध्ये जे कॅमेरा आहेत ते फक्त दोनच आहेत. एक ४८ मेगापिक्सेलचा आणि एक १२ मेगापिक्सेलचा टेलेफोटो सेन्सॉर आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने तुम्ही कमी प्रकाशात पण चांगले फोटो काढू शकाल. यावेळी अॅपलने एआय चा वापर पण केला आहे. यात तुम्ही जर पोर्ट्रेट फोटो काढले असतील तर तुम्ही नंतर फोकस बदलू शकाल. म्हणजे पोर्ट्रेट मध्ये मागचा व्यक्ति ब्लर होतो तर तुम्ही पुढचा व्यक्ति ब्लर करून मागच्या व्यक्तीला स्पष्ट करू शकता.
यांच्या मदतीने तुम्ही २x ऑप्टिकल झूम फोटो काढू शकता. ४k सिनेमॅटिक विडियो पण तयार करू शकता.
आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस Iphone 15 plus मध्ये तुम्हाला २००० निट्स ची पीक ब्राइटनेस मिळणार आहे. यात अॅपलचा तोच रेटिना डिस्प्ले मिळतो. फोन हुडकण्यासाठी जो अल्ट्रा वाइड बॅंड वापरला जातो आता तो तीन पट जास्त कार्यक्षम केला आहे. जर फार गर्दीच्या ठिकाणी असाल तर तुम्ही तो गोंधळ कमी करू शकता फोन वर बोलताना. तसं हे फीचर सॅमसंगने त्यांच्या फ्लिप आणि फोल्ड फोन मध्ये आधीच दिलं होतं.
यावेळी अॅप्पलने काही नवीन सॅटलाइट फीचर्स दिले आहेत. जसे कॉल करणे, लोकेशन शेअर करने. पण ते फक्त सुरुवातीच्या २ वर्षांसाठीच मोफत असतील. आणि हो सी टाइप चार्जिंग पोर्ट पण मिळणार आहे सोबतच इतर डिव्हाईस सोबत पण हा पोर्ट मिळणार आहे जसे इयरफोन.
Iphone 15 Pro & Iphone 15 Pro Max चे स्पेसिफिकेशन
यांच्या डिझाईन मध्ये पण काही बदल नाही. तोच तीन कॅमेऱ्यांचा सेटअप असणार आहे.
यांच्या मध्ये titanium हा धातू वापरण्यात आला आहे जो अॅल्युमिनियम पेक्षा जास्त मजबूत आणि हलका आहे. प्रो साठी ६.१ इंचची स्क्रीन आहे आणि प्रो मॅक्स साठी ६.७ इंचची स्क्रीन आहे.
या मध्ये एक अॅक्शन बटन दिले आहे. जे आधी फोन सायलंट करण्यासाठी वापरण्यात यायचा. आता याच्या मदतीने तुम्ही नवीन वेगवेगळे काम करू शकाल.
यात अॅपलची नवीन A१७ चिप मिळणार आहे. जी खरंच खूप शक्तिशाली आहे. ही ३ nm या तंत्रज्ञानावर आधारित आहे. जी जगात पहिली अशी चिप आहे. यात एकूण १९ अब्ज ट्रांजिस्टर्स वापरले आहेत. याच्या मदतीने काही मशीन लर्निंग चे कामं सरळ तुमच्या फोनमध्येच केले जातील यासाठी तुमची माहिती कुठेही पाठविली जाणार नाही.
या फोन मध्ये जो सी टाइप पोर्ट मिळणार आहे तो USB 3 असणार आहे. याची स्पीड ही १० gbps ची असणार आहे. जी की अजूनही कोणत्याच फोनमध्ये नाही. जी वीस पट फास्ट आहे. हा फोन गेमिंग साठी खूपच चांगला आहे. याच्या मदतीने जे console मध्ये गेम खेळले जातात ते पण तुम्ही A१७ या चिपच्या मदतीने खेळू शकता.
यात एकूण तीन कॅमेरा आहेत. ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. यावेळी यातील सेन्सॉर वाढवला आहे. ज्याने अजून चांगले फोटो येतील. चार पट जास्त रेजोल्यूशन यात मिळतील. १२ मेगापिक्सेलचा टेलेफोटो कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा. यात तुम्ही ४k विडियो ६० fps मध्ये रेकॉर्ड करू शकता. तेही फक्त आयफोन मध्येच. दुसऱ्या कोणत्याच फोन मध्ये ६० fps चा पर्याय नाही. यात तुम्ही ३d विडियो पण तयार करू शकता जो अॅपल व्हीजन प्रो मध्ये पाहू शकता.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद !