Aditya L1 Information in Marathi
मित्रांनो चंद्रयान 3 च्या यशा नंतर आता भारत सूर्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. ISRO द्वारे चांद्रयान 3 नंतर सूर्ययान म्हणजेच Aditya L1 मिशन राबवली जाणार आहे. Aaditya L1 Mission काय आहे? केव्हा लाँच होणार? काम काय आहे? केव्हा पोहोचणार? अशी संपूर्ण माहिती आपण आता या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
Aaditya-L1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे राबवलेली एक सौर मोहीम आहे. या मोहिमेचे नाव आदित्य L1 मोहिम असे आहे, यालाच सूर्ययान असे देखील म्हंटले जाते. चंद्रयान 3मोठ्या यशा नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना शुभेच्छा देताना सर्वात प्रथम या नवीन मोहिमेची माहिती दिली होती. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने राबवलेली ही पहिली सौर मोहीम आहे.
केव्हा लाँच झाले?
आज म्हणजेच 2 सप्टेंबर, 2023 ला आदित्य L1 यान ठीक 11:50 मिनिटांनी लाँच झाले आहे. PSLV Lanuch Pad द्वारे Aaditya L1 यानाचे प्रक्षेपण यशस्वी झाले आहे. Chandrayan 3 नंतर सर्वात मोठी मोहीम ही आदित्य L1 असणार आहे, कारण भारताने आज पर्यंत कधीच सूर्य मोहिम राबवली नाही. आदित्य L1 ही भारताची पहिलीच सूर्य मोहिम आहे, चंद्रावरून थेट सूर्या कडे भारताने ही जी झेप घेतली आहे ती अभिमानास्पद आहे. ही ISRO आणि भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील मोठी अविस्मरणीय मोहीम आहे.

केव्हा आणि कोठे पोहोचणार?
आदित्य L1 यान हे सूर्य मोहिमेसाठी बनवले गेले आहे, पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर Aaditya L1 पोहोचणार आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील L1 बिंदू पर्यंत यान जाणार आहे, आणि तेथून सूर्याची माहिती गोळा करणार आहे.
आदित्य L1 यानाला त्याच्या निश्चित जागी पोहोचण्या साठी एकूण 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. म्हणेजच एकूण 125 दिवस ही मोहीम चालणार आहे, त्यांनतर डिसेंबर 2023 मध्ये Aaditya L1 यान हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील L1 बिंदू म्हणजेच कक्षे पर्यंत जाणार आहे. आणि तेथून सूर्य हा तब्बल 150 मिलियन लाख किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजेच 15 कोटी किलोमीटर अंतर हे Aaditya L1 यान आणि सूर्य यांच्यात असणार आहे.
उद्देश काय आहे?
1.सूर्याच्या कोरोनाची रचना आणि गतिशीलता अभ्यासण्यासाठी.
2.सोलर फ्लेअर्स आणि कोरोनल मास इजेक्शनचे मूळ समजून घेण्यासाठी.
3.पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी सौर वाऱ्याच्या परस्परसंवादाचा अभ्यास करणे.
4.अवकाशातील हवामानाविषयीची समज सुधारण्यासाठी.
अंतराळ संशोधनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
अशा काही महत्वाच्या बाबी Aaditya L1 यान शोधणार आहे, वर दिलेल्या काही बाबी या आदित्य L1 यानाचा उद्देश आहेत. सूर्याचा अधिक जवळून अभ्यास करणे, हे पण त्यातील एक महत्वाचे असे मुख्य उदिष्ट आहे.
FAQ
Q.आदित्य l1 कधी लाँच झाला?
Ans.दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी ठीक 11:50 AM आदित्य L1 यान लाँच झाले.
Q.आदित्य l1 मिशन का सुरू केले?
Ans.पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील L1 कक्षेत जाऊन, सूर्याचा सखोल अभ्यास करणे.
Q.आदित्य l1 काय करेल?
Ans.L1 कक्षेत यान स्थापित करणे, आणि 7 पेलोड्स द्वारे सूर्याच्या कोरोनाचे वेगवेगळ्या वेव्हबँड्समध्ये निरीक्षण करणार आहे.
Leave a Reply to Nishant Sharma Cancel reply