इंफॉरमेशन अँड टेक्नॉलॉजीच्या या युगात कंप्यूटरविना कोणत्याही कामाची कल्पना करणं कठीण झालं आहे.कंप्यूटर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्या सर्व सरकारी आणि बिगर सरकारी कामे जसे की वीज-पाणी बिल, बुकिंग आणि बँकिंग संबंधित सर्व कामासाठी आपण ऑनलाइन कंप्यूटरवर अवलंबून आहोत. त्यामुळे कॉम्प्युटर असो स्मार्टफोन असो अथवा लॅपटॉप कोणत्याही डिव्हाइसवर काम करताना काही शॉर्टकट्स कीज माहिती असणे गरजेचे आहे.
शॉर्टकट्स कीज माहिती असल्यावर या डिव्हाइसच्या माध्यमातून काम लवकर करता येते व वेळेची देखील बचत होते. कारण त्यांच्या मदतीने तुमचे काम सोपे आणि जलद होते.
आज तुमच्या मदतीसाठी आम्ही कॉम्प्युटरच्या अशाच काही शॉर्टकट कीजची माहिती घेऊन आलो आहोत ज्या खूप उपयोगी ठरतील. काही खास शॉर्टकट की आणि त्यांच्या वापराविषयी सविस्तर जाणून घेऊया.
बेसिक कीबोर्ड शॉर्टकट की
- Ctrl +A सर्व सिलेक्ट करण्यासाठी
- Ctrl + B टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी
- Ctrl + C कॉपी करण्यासाठी
- Ctrl + D फॉन्टसाठी
- Ctrl + E सेंटरमध्ये आणण्यासाठी
- Ctrl + F सर्चसाठी
- Ctrl + G गो टू मेन्यूसाठी
- Ctrl + I इटॅलिक फॉन्टसाठी
- Ctrl + J टेक्स्ट जस्टिफाय करण्यासाठी
- Ctrl + K मध्ये हायपरलिंक जोडण्यासाठी
- Ctrl + L डाव्या एलाइंमेंटसाठी
- Ctrl + M मूव्ह करण्यासाठी
- Ctrl + N नवीन फाईलसाठी
- Ctrl + O फाईल ओपन करण्यासाठी
- Ctrl + P प्रिंटसाठी
- Ctrl + Q बंद करण्यासाठी
- Ctrl + R रिलोड आणि राइट एलाइंमेंटसाठी
- Ctrl + S फाईल सेव्ह करण्यासाठी
- Ctrl + U टेक्स्ट अंडरलाइन करण्यासाठी
- Ctrl + V पेस्ट करण्यासाठी
- Ctrl + X कट करण्यासाठी
- Ctrl + Y रीडू करण्यासाठी
- Ctrl + Z अनडू करण्यासाठी
- Ctrl+W – फाईल क्लोज करण्यासाठी
फंशन शॉर्टकट की
- F2: सिलेक्ट केलेल्या फाईलनं नाव चेंज करण्यासाठी.
- F4: F4 सह Alt प्रेस केल्यावर कंप्यूटरवर ओपन विंडो बंद होते, तसेच कंप्यूटर बंद (शट डाउन) करण्यासाठी.
- F5: विंडोज कंप्यूटर किंवा ब्राउजरमधील वेबसाइट रिफ्रेश करण्यासाठी.
- F6: ब्राउजरच्या अॅड्रेस बारमध्ये जाण्यासाठी.
- F7: Ms Word मध्ये Spell and Grammar check चा ऑप्शन वापरण्यासाठी.
- F8: Computer/Laptop मध्ये Windows Install करताना या Key चा वापर केला जातो.
- F9: Microsoft Word मध्ये Document Refresh करण्यासाठी.
- F10: सॉफ्टवेयर किंवा प्रोग्राम मेनू सिलेक्ट करण्यासाठी.
- F11: कोणतंही Software, Browser किंवा Application Full Screen Mode मध्ये वापरण्यासाठी.
अल्टर्नेटिव की (Alt)
- Alt + E : चालू प्रोग्राममध्ये Edit ऑप्शन ओपन करण्यासाठी.
- Alt + F : चालू प्रोग्राममध्ये फाईल मेन्यू ओपन करण्यासाठी.
- Alt + F4 : प्रोग्राम किंवा Window बंद करण्यासाठी.
- Alt + Enter : प्रॉपर्टीज बघण्यासाठी
- Alt + Tab : प्रोग्राम किंवा विंडो स्विच करण्यासाठी.
- Alt + Shift + Tab : मागील प्रोग्राम किंवा विंडोवर स्विच करण्यासाठी.
- Alt + Print Screen : विंडोचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी.
वर दिलेले काही शॉर्टकट वापरून तुम्ही संगणकावर सहज आणि वेगाने काम करू शकता व स्मार्ट बनू शकता, या लेखाबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही त्या कॉमेंट्सद्वारे प्रकट करू शकता.
Refrences : www.google.com/online sites/articles